ज्याने कायम भाजपाला विरोध केला त्याचा पक्षात प्रवेश नको – राम वाकडकर

Pune Pcmc News – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत भाजप प्रवेशा संदर्भात हालचाली सुरू केल्याची चर्चा असतानाच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र कलाटे यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. आम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून आयात उमेदवाराला भाजपमध्ये संधी देऊ नये अशी भूमिका स्थानिक नेते भाजपा उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी घेतली आहे.

ज्या व्यक्तीने कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला अशा व्यक्तींना पक्ष स्थान देऊ नये अशी भूमिका चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे,

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष राम वाकडकर म्हणाले की उद्या होणाऱ्या महापालिकेत डोळ्यासमोर पराभव होता ना दिसत आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या मंडळींना पक्ष स्थान देऊ नये अशी मागणी त्यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे व चिंचवड मतदार संघाचे आमदार शंकर शेठ जगताप यांच्याकडे केली आहे.

प्रत्येक निवडणुकीत हे व्यक्ती पक्ष बदलतात व हाती काही लागतात का ते पाहतात याच्यापुढे हे काहीच करू शकत नाहीत यांचा राजकीय इतिहास तपासावा अशी देखील टीका यावेळी त्यांनी नाव न घेता राहुल कलाटे यांच्यावर केली.