पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पुणे प्रतिनिधी -: देशासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महिलांच्या उज्ज्वल कार्याचा सन्मान करण्यासाठी राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षीचा राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई श्रीमती सरिता गंगाधर फडणवीस यांना व आशालता आत्माराम कलाटे यांना आदर्श पालक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे सामाजिक कार्यकर्ते राजन खान, राजमाता जिजाऊंचे वंशज रणजितसिंह जाधवराव अश्विनी राजे जाधवराव, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ शितल मालुसरे आदी उपस्थित होते.
मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती अशालता आत्माराम कलाटे यांची ग्रंथतुला संपन्न
मुळशी पंचायत समितीच्या माजी सभापती आशा लताताई आत्माराम कलाटे यांची ग्रंथतुला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली यामध्ये पुस्तकांचा अनेक संग्रहातून मोठ्या उत्साहात ग्रंथतुला संपन्न झाली
गेल्या अनेक वर्षापासून राजमाता जिजाऊ पालक पुरस्कार हा वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना दिला जातो, मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जातो.
या वर्षीचे पुरस्कारार्थी सिने मराठी सिनेस्टार मकरंद अनासपुरे यांच्या मातोश्री सौ.माधुरी अनासपुरे, ज्येष्ठ पत्रकार विनोद बडे यांच्या सौ. मातोश्री सौ. जमुनाबाई बडे, डॉ. प्रसाद जोशी यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री जोशी, निवृत्त जवान दत्तात्रय ताकवले यांच्या मातोश्री श्रीमती. आनंदीबाई ताकवले, रयत संस्थेच्या प्राचार्या सौ.झिनत सय्यद, प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रय माळशिकारे यांच्या मातोश्री श्रीमती. लक्ष्मीबाई माळशिकारे, साखर कामगार श्रीमती. शालन देशमुख, बँकिंग क्षेत्रातून सौ. संगीता देविदास ननवरे या मातांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावर्षी राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार भारत देशाला महिला क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मिळून देणारे कोच श्री.अमोल मुजुमदार यांचे वडील श्री.अनिल मुजुमदार, पुण्याचे माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे वडील श्री नथ्थू चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी श्री.मंगेश चिवटे यांचे वडील श्री. नरसिंह चिवटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती श्री. प्रमोद काका काकडे, साखर कामगार श्री.मारुती ननवरे यांना देण्यात आला.
दिव्यांग लोकांसाठी कार्यरत असणारे डॉक्टर प्रशांत उटगे व डॉक्टर अपर्णा उटगे आणि मुलांसाठी आनंददायी शाळा चालवणारे आनंदक्षण लर्निंग स्पेस या संस्थेच्या सौ. अमरजाताई व सौ. आरतीताई यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष श्री. विक्रम ननवरे यांनी केले सूत्रसंचालन सौ.नीता मुढाळे यांनी केले आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री. विराज देशमुख यांनी केले.
