मांजरी प्रतिनिधी -: (Manjari Pune) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने 50 लक्ष रुपयाच्या कामाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले.
याप्रसंगी मांजरीचे सरपंच पुरुषोत्तम अण्णा धारवडकर, ग्रामपंचायत सदस्य अमित आबा घुले, शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला आंबीलकर यांच्या हस्ते झाले.
गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्त श्री नवल किशोर राम यांच्याकडे यासंदर्भात निधीची मागणी केली होती आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत शाळेची सीमा भिंत स्वागत कमान विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण लायब्ररी यासाठी 50 लाख रुपये मंजूर केले अखेर या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शेवाळे म्हणाले की महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे आजपर्यंत राज्यात किंवा देशात सर्वाधिक IAS IPS अधिकारी हे जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळेतीलच आहेत त्यामुळे भविष्यात मांजरीची शाळा ही स्मार्ट शाळेत ओळख निर्माण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी पुणे महापालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांचे देखील शेवाळे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, अमित घुले, अविनाश भंडारी, तेजस कलाल, विशाल जाधव, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
