राधिका आपटेने सांगितला ‘या’ हिंदी सिनेमात काम करण्याचा अनुभव

Pune Mahesh Manjrekar : राधिका आपटे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने मराठीसह हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच तिला या इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण झाली आहेत.

राधिकाने यावेळी या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेचीही तक्रार करत काम करण्याचा अनुभव खूप वाईट असल्याचं म्हटलं आहे. राधिकाने ‘स्क्रीन’शी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. याबद्दल राधिका म्हणाली, “त्या चित्रपटाचे निर्माते खूपच वाईट होते. त्यांनी माझ्या राहण्याची सोय केली नाही, पैसेही दिले नाहीत. माझ्या आईने आणि मी जेव्हा करारावर सही करण्यासाठी विचारलं तेव्हा ते म्हणाले, अरे उर्मिला मातोंडकरनेही करार केला नव्हता. तिने केला की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला खूप वाईट वागणूक दिली गेली.”

राधिका पुढे म्हणाली, “महेश मांजरेकर खूप छान वागले, पण तरीही त्या चित्रपटाची आठवण काढायला मला आवडत नाही, कारण निर्मिती संस्थेचा अनुभव खूपच खराब होता आणि हे मी उघडपणे सांगते.” यावेळी तिने तिला तिच्या या चित्रपटाबद्दल बोलायला आवडत नाही असे सांगितले.

राधिका आपटे ‘साली मोहब्बत’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, जो १२ डिसेंबर २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. टिस्का चोप्रा अभिनीत या चित्रपटाला यापूर्वीच अनेक ठिकाणी प्रशंसा मिळाली आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) आणि शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे.