पूरग्रस्तांना मदतीचा हात; मोशीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड – (Pimpri-Chinchwad) मराठवाडा परिसर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निखिल बोराडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

त्यांनी स्वखर्चाने अनेक किट तयार केले असून मोशी भागातील नागरिकांना देखील आव्हान केले होते एक हात मदतीचा ज्यांना जसे जमेल तसे वस्तू स्वरूपात द्याव्यात या मागणीला देखील परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

नागरिकांनी धान्य तांदूळ व जीवन आवश्यक की वस्तू निखिल बोऱ्हाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिल्या.

मराठवाड्यातील लोक कुटुंबाचा एक भाग आहेत. त्यांच्या दु:खात सर्वांनी सामील व्हावे, हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही मदत असली तरी आपण सर्व जण एकत्र असल्याची भावना अधिक आहे. या वेळी सामाजिक जबाबदारी ओळखून प्रत्येकाने शक्य त्या पद्धतीने हातभार लावावा असे आवाहन निखिल बोऱ्हाडे यांनी केले आहे.