पुण्यातील रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक

Share

पुणे प्रतिनिधी (Pune Rave Party) पुणे शहरातील (Pune Crime) उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत धाड (Police Raid On Pune Rave Party) टाकली.

पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरातील फ्लॅटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, मद्य व हुक्के जप्त केले असून, पार्टीमध्ये नशेचे सेवन सुरू होते. पार्टीत सहभागी असलेल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे.

पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या
खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन होत असल्याचं उघड झालं. या पार्टीत तीन महिला आणि ४ पुरुष सहभागी होते. २६ जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा पुणे पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला. विशेष बाब म्हणजे, या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली असून, त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. तपास सुरू आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *