Pune News पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची पुण्यात घोषणा केली असून उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे. ही अकॅडमी म्हणजे बीसीसीआय स्तरावरील देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप ठरणार आहे.
जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची ही व्यवस्था तरुण खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटकडे नेणारा भक्कम मार्ग ठरेल, असा विश्वास अकॅडमीचे मालक पुनीत बालन यांनी व्यक्त केला.
‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून नेहमीच विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भारतीयांमध्ये क्रिकेट खेळांमधील प्रेम लक्षात घेऊन आता क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडविण्यासाठी त्यांनी ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा केली आहे.
याबाबत माहिती देताना पुनीत बालन म्हणाले, ”या अकॅडमीसाठी दोन प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे. सिंहगड कॉलेजच्या वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांचा त्यात समावेश आहे. या अकॅडमीतील सर्व सुविधा बीसीसीआय मानकांनुसार असणार असून पुढील सिझनपासून बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजन येथे केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे बीसीसीआय प्रशिक्षित प्रशिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. येत्या १ जानेवारीपासून प्रवेश सुरू होणार असून दि. १५ जानेवारीपासून प्रत्यक्ष कोचिंग सुरू होणार आहे. ही प्रोफेशनल अकॅडमी असल्यामुळे प्रवेश मर्यादित असणार आहेत.”
ही अकॅडमी पुणे आणि महाराष्ट्रातील तरुण क्रिकेटपटूंना व्यावसायिक पातळीवर नेण्यासाठी मोठी मदत ठरणार असून, क्रिकेटमधील करिअर करण्याची इच्छाशक्ती असलेल्या मुला-मुलींसाठी ही एक ऐतिहासिक संधी मानली जात आहे.
पुनीत बालन हे भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते क्रिकेट खेळाडू[३] व सामाजिक कार्यकर्ते [४] आहेत. ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे ते सुपुत्र आहेत. [५] श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ते विश्वस्त तसेच उत्सवप्रमुख आहेत. [६] [७] पुणे जगवर्स (टेनिस), [८] मुंबई खिलाडीज (खो खो), [९] महाराष्ट्र आयर्न मॅन (हॅन्डबॉल), [१०] प्रीमियर बॅडमिंटन, टेबल टेनिस असे विविध क्रीडा प्रकारातील संघाचे ते मालक आहेत. काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहा शाळा भारतीय लष्करासोबत चालविन्यास घेतल्या असून या सर्व शाळा बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पेहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेगम, व्हेन, घुरेस या भागात या सर्व शाळा आहेत. बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या डगर स्कुलला देखील भारतीय लष्करासोबत ते चालवत आहेत. [११] काश्मीर मध्ये केलेल्या समाजकार्याबद्दल पुनीत बालन यांना भारतीय लष्कराकडून गौरवण्यात आले. [१२]
