पुणे प्रतिनिधी (Pune update news Baner land sale ) बाणेर प्रकरणात जो काही निर्णय झालेला आहे तो २००६ मध्ये झालेला आहे. त्याची रजिस्ट्री व खरेदीखत २००९ मध्ये झालेली आहे.
900 कोटीची जमीन केवळ केवळ साडेनऊ कोटीला विकली पुणे अपडेट न्यूजने वृत्त प्रकाशित केल्यानंतर व बोर्डच्या अध्यक्षाला जाग आली
२०१३ मध्ये कायद्यात तरतूद होती ती जमिन वक्फ मंडळाच्या परवानगीने विकता येत होती. ती जमिन त्या कायद्याच्या नियमानुसार विक्री केलेली आहे. त्याच्यानंतर तो निर्णय चुकीचा आहे, याबाबत १६ वर्षात कोणीही, कोणत्याही न्यायालयात त्याला चॅलेंज केलेले नाही. तसेच कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. मात्र आज तो विषय काढला जात आहे तो केवळ माझ्याविरूब्द राजकारण म्हणून काढला जात आहे असे प्रतिउत्तर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात रविवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत ना. समीर काझी बोलत होते. दि.५ ऑगस्ट रोजी वक्फ बोर्डाचा अध्यक्ष म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याबद्दल समीर काझी यांनी पत्रकार परिषदेत वर्षभरात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली. वक्फ मंडळात वर्षभरात केलेल्या सुधारणा, लोकउपयोगी निर्णय यामुळे मंडळाचे उत्पत्र अडीचपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ बोर्डाच्या डिजीटायलेशनचे काम प्रगतीपथावर असून शंभर ते दोनशे वर्षापुर्वीचे जिर्ण असलेले रेकॉर्ड स्कॅन करून जतन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरातील धोरणात्मक निर्णयामुळे वक्फ बोर्डाच्या कामामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे.
त्यामुळेच काही विघ्न संतोषी विरोधक राजकारण करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करून वक्फ बोर्डाला वेठीस धरण्याचा कट देखील रचण्यात आल्याचे सांगून २४ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सुनावणीच्यावेळी देखील याच पध्दतीचे पडयंत्र रचण्यात आले होते असे त्यांनी सांगितले