Pune Update नवले पूल परिसरात पंक्चर स्कॅम उघडकीस आला आहे. पंक्चर वाले दुकानदार आणि अन्य २ साथीदारांना रस्त्यावरील गाड्यांना तुमच्या गाडीच्या चाकमध्ये हवा कमी आहे आहे असे खोटे सांगून चलाखीने चाकाला ६ ते ७ पंक्चर करत असल्याचे समोर आले आहे.
हा पातित पवन संघटना खडकवासला विभागाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संघटनेचे कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला उभे असतांना २ इसम पल्सर गाडीवरून सारखे चकरा मारत होते व गाड्यांना हात करून बाजूला घेत असे वर त्या पंक्चरच्या दुकानात नेत होते. पहिल्यांदा कार्यकर्त्यांना वाटले की खरच असेल त्यामुळं त्यांनी दुर्लक्ष केले. पण एका चारचाकी मध्ये दोन महिला चालल्या असताना चारही चाके चांगल्या स्थितीत असताना ‘सद्दाम हुसेन’ नावाच्या इसमाने त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले व त्या पंक्चरच्या दुकानात घेऊन गेला.
कार्यकर्त्यांनी त्याला आवाज दिला असता तो तिथून पळून गेला. तेव्हा त्यांना खात्री झाली की हा सगळा वेगळा प्रकार आहे. त्यामुळे पतीत पवन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानातील दोन्ही कामगारांना विचारपूस केली असता ते गडबडून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. कार्यकर्त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली व त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले व त्यांच्या वर कारवाई करून त्या सद्दाम हुसेन नामक इसमचा शोध घेण्यास व त्यांचे दुकान बंद करण्यास पोलिसांना सांगितले आहे.
कसा सुरु होता स्कॅम?
पंक्चर वाले दुकानदार आणि अन्य २ साथीदार रस्त्यावरील गाड्यांना तुमच्या गाडीच्या चाकमध्ये हवा कमी आहे आहे असे खोटे सांगून दुकानात घेऊन येत आणि त्यांना गाडीवरून उतरून द्यायच्या आधी चाकाला हात लावून अंगठीला असलेल्या खिळ्याद्वारे चाकाला ६ ते ७ पंक्चर करत होते विशेष म्हणजे ते फक्त एकटी महिला किंवा जोडपे बघून हा प्रकार करत होते आणि हवा भरण्यासाठी ग्राहक आला की त्याला जबरदस्ती ९०० रुपयाचे लिक्विड टायर मध्ये टाकण्यास आग्रह करत असे ग्राहकाने नकार दिल्यास खोटे पंक्चर काढून टायर रिपेअर होत नाही असे सांगत आणि ते लिक्विड टाकण्याची गरजच आहे हे भासवून पैसे उकळत होते.