Pune Pcmc Election मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटन अन् सायंकाळी होणार पालिका निवडणुकीची घोषणा!

Pune पुणे महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहेत. त्यापूर्वी सत्ताधारी भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्याच्या अगदी तोंडावर, भविष्यातील मतांची पेरणी करण्यासाठी पुण्यात तब्बल 3000 कोटी रुपयांच्या विकासकामांचे नारळ फोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उद्या सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील 60 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सत्ताधारी लगबगीने उरकून घेत आहेत.

सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच येथे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे बोलला जात आहे.