Pune news पुणे जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Share

पुणे प्रतिनिधी :: राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सह. बैंक पुरस्कार पुणे सहकारी बँकेला (
Pune District Central Co-Operative Bank Ltd.) जाहीर झाला आहे. त्यामुळे बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या शुभहस्ते बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला, पुरस्कार स्वीकारताना पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक सुरेश घुले, रंजीत तावरे, प्रवीण भैय्या शिंदे, संभाजी होळकर, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान करताना राज्य बँक असोसिएशनचे अध्यक्ष विजय देशमुख, भाऊसाहेब कड, ज्येष्ठ नेते रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, सहकारातील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्याबद्दल घेतली राज्यमंत्री भरणे मामा यांची भेट

पुणे जिल्हा बँकेला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांची अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी भेट घेतली, त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासीयांच्या मनात विश्वासाचे नाते तयार झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये पुणे बैंकेचा सिंहाचा वाटा आहे. बैंकेस मिळालेल्या या पुरस्कारामुळे बँकेने साधलेली सर्वांगीण प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कै. वैकुंठभाई मेहता हे भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी बॉम्बे स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजे आताची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुमारे 35 वर्षे कामकाज सांभाळले. ही बँक म्हणजे सबंध मुंबई व राज्यातील ग्रामीण पुनर्रचना कार्याचे केंद्र बनवले. वैकुंठ भाईंचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण होय. म्हणूनच त्यांच्या नावाने जाहीर होणार हा पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक असोसिएशन, मुंबई यांच्यामार्फत दिला जातो.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *