Pune News: हिंजवडीत धक्कादायक प्रकार; चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं

Pune News – अंगवाडी सेविका अन् मदतनीस यांनी मिळून वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या (Pune News) व्हिडिओत मुलं अक्षरशः रडत असल्याचं दिसून येतं आहे.

पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केला आहे. (Pune News)

ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीसाठी जाण्यासाठी दोन्ही अंगणवाडी सेविकांनी मुलांना केंद्रातच बंद ठेवून अंगणवाडीला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा प्रसंग काल (बुधवारी, ता २६) सकाळी सुमारे ११ ते १२ या वेळेत घडला. उपस्थितांनी ही गंभीर बाब तातडीने मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांच्याकडे पोहोचवली. त्यानंतर गिराम यांनी सेविका शिंदे आणि साखरे यांना तत्काळ बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले.