Pune News | दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक ;तरुणाचा मृत्यू

कोरेगाव पार्कमध्ये मैत्रिणीसोबत निघालेल्या दुचाकीस्वाराला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. रस्त्यावर पडलेला दुचाकीस्वार पाठीमागून येणाऱ्या टेम्पोच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.

दुचाकीस्वार, टेम्पोचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.शिवम सिंग (वय २२, रा. एअरफोर्स स्टेशन, विमाननगर) याचा अपघातात मृत्यू झाला आहे. धडक दिलेल्या दुचाकीस्वाराचे नाव कळलेले नाही. टेम्पोचालक इंद्रजीत संजय नरोटे (रा. येवलेवाडी, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवम सिंगची बहीण नेहा (वय २०) हिने कोरेगाव पार्क पोलिसांत फिर्याद दिली आहे.

शिवम मैत्रिणीसह मंगळवारी सकाळी कोरेगाव पार्कमधून निघाला होता. त्याला पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. शिवमचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर पडला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने शिवम गंभीर जखमी झाला. त्याची मैत्रीणही जखमी झाली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. शिवमचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.टेम्पोचालकासह दुचाकीस्वाराचा शोध सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ तपास करत आहेत.