पुण्यात नेमकं चाललय काय? धनकवडीत दहशतीचा थरार;

Share

Pune news पुणे प्रतिनिधी :: सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी (ता. 22) मध्यरात्री दहशतीचा प्रकार घडला. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर भागात 3 अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना 23 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली असल्याचे समोर आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांच्या काचा फोडल्या असून वाहनांचे मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून त्यांनी जखमी केले. या दोघांना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्यासाठी डीबी पथक कार्यरत झाले आहे. या घटनेमुळे धनकवडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *