पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ‘एवढ्या’ मतदारांना मतदानाचा हक्क

Share

पुणे प्रतिनिधी (Pune mahapalika) आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ९० लाख ३३ हजार मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै रोजीच्या मतदार यादीनुसार ही संख्या अंतिम केली आहे.

पुण्यात ३४ लाख ४० हजार तर, पिंपरी-चिंचवडमध्ये १७ लाख मतदार महापालिकेसाठी मतदान करू शकणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्या, असे आदेश मे महिन्यात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानेही मतदानाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे.

पुणे शहराचा विचार करता हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ४५ हजार ६९१ तर सर्वात कमी कसबा पेठ मतदारसंघात २ लाख ८५ हजार ७०१ मतदार आहेत.

जिल्ह्यातील एकूण मतदार : ९०,३३,१०४
पुरुष मतदार : ४६,६६,९२०
महिला मतदार : ४३,६५,३३७
तृतीयपंथी मतदार : ८४७
पुणे शहर : ३४,४०,३३८
पिंपरी शहर : १७,००,७५१


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *