पुणे प्रतिनिधी :: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पौड येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मुळशी तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजन करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या वतीने करण्यात आले होते,
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात तालुक्यातील शेतकरी सभासद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाचे महत्व रुजविणे आणि नैसर्गिक साधनांचे जतन करण्याचा संदेश देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरदराव बुट्टे पाटील, माजी शिक्षणाधिकारी आनंद गुंजाळ सर, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे ,तालुका अध्यक्ष अंकुश मोरे,जिल्हा परिषद माजी गटनेते शांताराम इंगवले,पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे,जेष्ठ नेते संजय उभे,माजी जि.प.सदस्या स्वातीताई हुलावळे,महिला तालुकाध्यक्ष निताताई नागरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमितदादा कंधारे,माजी जि.प.सदस्या अंजलीताई कांबळे,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष आनंदा घोघरे,सुनील वाडकर,विजयबाप्पू ढमाले,युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर,माऊली कांबळे,बबनराव धिडे,माऊली साठे,शिवसेनेच्या नेत्या स्वातीताई ढमाले,मार्केट कमिटी संचालक रामभाऊ गायकवाड,माजी उपसभापती भानुदास पानसरे,
भाऊ आखाडे,जयराम दिघे,सचिन अमराळे,सुनील कदम,सरपंच विनोद सुर्वे,माऊली साठे,किसन नागरे,अशोक कांबळे,आनंदा रोकडे,अनंता कंधारे,शांताराम शिर्के,विभागीय अधिकारी सुरेश नागरे,वसुली अधिकारी राजेंद्र मारणे,सर्व संस्थांचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,संचालक,सचिव,सेवक वर्ग व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते,