पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण

Pune News जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण शुक्रवारी (दि १२) जाहीर करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्ग झाले आहे. त्यामुळे अनेकांना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत.

तर सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या 6 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे.

मागील तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडविल्यानंतर तात्काळ जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शुक्रवारी राज्यातील 36 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सध्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये पक्षसंघटन वाढीची स्पर्धा लागली आहे. त्यातच आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाल्याने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.