मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केल्यानंतर सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबाबत हैद्राबाद गॅझेटियरचा जीआर काढला आहे. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वीच मागील दोन वर्षातील पुणे जिल्ह्यातील कुणबी नोंदींची आकडेवारी समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात दोन लाख 86 हजार हून अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत. जिल्ह्यात 51 हजार 349 जणांनी अर्ज केला होता अर्ज केल्यानुसार त्यांना दाखले देण्यात आले आहेत. आंबेगाव जुन्नर खेड या तालुक्यातील नागरिकांनी सर्वाधिक कुणबी दाखले घेतले आहेत. 2023 पूर्वी 47 हजार जणांना कुणबी दाखले पुणे जिल्ह्यात प्राप्त झाले होते.
मागील दोन वर्षांत मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदीसाठी कागदपत्रांची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली. या नोंदीसाठी १३ प्रकारच्या कागदपत्रांच्या घेण्यात आला. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आणि अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज आदी पुराव्यांची वैधानिक; तसेच प्रशासकीय तपासणी करण्यात आली.
