पुणे भाजपा राष्ट्रवादी श्रेय वादाची लढाई; तर नागरिक म्हणतात

Pune News – : बाणेर परिसरातील व हायवे लगतच्या परिसरातील नागरिकांना या ट्राफिकच्या समस्येमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले होते, रहिवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

अखेर अनेक वेळा अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत प्रशासनाने डीपी रोडच्या कामाला सुरुवात केली येत्या 2 ते 4 दिवसातच हा रस्ता सुरू करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मात्र त्यापूर्वीच या रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टीत मोठी श्रेवादाची लढाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे.

17 मे 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन त्यांनी प्रलंबित रस्त्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रलंबित रस्ता पूर्ण करण्याचा प्रस्ताव सादर केला; व अधिकाऱ्यांना देखील सूचना देण्यात आल्या.

8 जुलै 2025

तात्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांची बदली झाल्यानंतर नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समीर चांदेरे व सोसायटीतील नागरिकांसमवेत तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या प्रशासकीय कामाच्या गती बद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत प्रलंबित रस्ता लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

12 जुलै २०२५ रोजी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यासोबत रस्त्याच्या कामाची पाहणी

17 सप्टेंबर 2025 रोजी डीपी रोडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात

बाणेर परिसरात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली यामुळे परिसरातील नागरिकांची ट्राफिकच्या समस्येतून मोठी सुटका होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींची सर्वांनी भेट घेतली त्यामुळे श्रेय वादाच्या लढाईत नागरिकांची मात्र ट्राफिकच्या चिंतेतून मुक्त होणार आहेत हे मात्र सत्य नाकारता येत नाही.

सोशल मीडियावर तपासले असता भाजपाच्या नगरसेवकाचे एकही पत्र आढळले नाही; मग नेमका पाठपुरवठा कोणाकडे केला? NCP पदाधिकाऱ्यांचा सवाल

याच संदर्भात रस्ता पाहणीसाठी आलेल्या नागरिकांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता स्थानिक नागरिक म्हणाले की हा रस्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला की भारतीय जनता पार्टीने केला या श्रेवादाच्या लढाईत आम्हाला जायचे नाही मात्र या भागाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडे आम्ही गेल्या आठ महिन्यापासून आग्रही भूमिका घेऊन सातत्याने बैठका घेत होतो त्यांनी देखील प्रतिसाद देत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरवठा करत तेथील बैठकीला सोसायटीतील स्थानिक नागरिकांना घेऊन आयुक्तांसमवेत आम्ही बैठकी घेतल्या होत्या हे नाकारता येणार नाही त्यामुळे बाबुराव चांदेरे साहेबांनी या रस्त्याच्या ट्राफिकच्या संदर्भात मोठी मेहनत घेतलेली आहे हे देखील नाकारता येणार नाही.

मात्र भारतीय जनता पार्टीच्या बाणेर बालेवाडी भागात असणाऱ्या नेत्यांनी पाठपुरवठ्यासंदर्भात कोणाची भेट घेतली? कोणाला निवेदन दिले याची माहिती मात्र आम्हा नागरिकांना माहीत नाही, व आम्हाला स्थानिक राजकारणात देखील पडायचे नाही मात्र नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी केलेल्या मेहनतीचे फळ कामाला आली असून लवकरच रस्ता सुरू होईल त्यामुळे सोसायटीच्या वतीने आम्ही बाबुराव चांदेरे यांचे आभार व्यक्त करतो अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

या संदर्भात आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करत होतो त्याला आज यश आले आहे यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे व यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार व भारतीय जनता पार्टीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी देखील खूप मोठी मदत प्रशासकीय यंत्रणेवरती आम्हाला केली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे देखील आभार मानत आहे.