भोर राजगड मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते लोकार्पण; मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे व मुळशी पंचायत समिती सदस्य काजल मोरे यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श
मुळशी | प्रतिनिधी
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत मुळशी तालुक्यात विकास आणि समाजसेवेचा संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व जनकल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे आणि पंचायत समिती सदस्या काजल अंकुश मोरे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पौड येथे वृक्षारोपण, १० हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांच्या वाटपाचा शुभारंभ, PDCC बँकेच्या CSR निधीतून मुळशी तालुका पत्रकार संघाला ₹२.५० लाखांचा धनादेश, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील रस्त्याचे लोकार्पण, तसेच स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शांताराम दादा इंगवले, PDCC बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मिलिंद दादा वाळंज, पंचायत समिती मुळशीच्या सभापती मंदाताई शेळके, क्राउज डेअरीचे संचालक कालिदास गोपालघरे, चंद्रकांत भिंगारे, पंचायत समिती गटनेते प्रवीण धनवे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक धैर्यशील ढमाले, राजेंद्र कुदळे सर, सुनील वाडकर, यशवंत गायकवाड, संजय उभे, विनोदभाऊ कंधारे, सचिन अमराळे, राजेंद्र दुबडे, सुखदेव मांडेकर, बाबा अनेने, नीता नागरे, निकिता राणवडे, गौरी भरतवंशी, राधिका वायकर, सरला कंधारे, माऊली साठे, रमेश अण्णा पवळे, मोहन निकटे, सुनील कदम, शिवाजी वीर, रामभाऊ वीर, शंकर वीर, बाळासाहेब बलकवडे, राजेंद्र ओकाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांनी जनसेवाच खरा धर्म असून, स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांना प्रेरणा मानत मुळशीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू,” असा निर्धार व्यक्त केला.
जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले हे उपक्रम मुळशी तालुक्यात लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या विकासाभिमुख आणि लोकहितकारी कार्याचा नवा आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
