Pune राज्यात आज बहुतांश ठिकाणी Nagarparishad आणि Nagarpanchayat निवडणुकांसाठी मतदान होत असून या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार होता. मात्र काही नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने आता निवडणूक निकालही पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे.
एकीकडे राज्यातील नगर पालिकांच्या निवडणुकांचं मतदान आज मंगळवारी पार पडलं. या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. नगर पालिकांच्या निवडणुकीनंतर आता राजकीय नेत्यांसहित लोकांनाही महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका कधी लागणार, याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कारण तांत्रिक कारणांमुळे 24 नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्वच नगरपालिकांचे निकाल आता उशिरानं लागणार आहेत. त्यामुळे आयोगाच्या यंत्रणेवरील ताण वाढलाय. तसंच नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका निवडणुका प्राधान्यानं घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीला ढकलण्याची शक्यता वर्तवणयात येत आहे.
पालिकेचे निकाल रखडल्यानं झेडपी लांबणीवर?
नगरपालिकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदानानंतर उमेदवारांना तब्बल १९ दिवस वाट पाहावी लागणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकींचा निकाल लांबणीवर गेल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याचं सांगण्यात येत आहे.
