Pune shivsena महाराष्ट्रभरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन आपण निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट केला आहे.
भाजपने पुण्यात सुरुवातीपासून स्वबळाचा नारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याची भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर आता शिंदेंच्या सेने सोबत युती करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी दर्शवली असल्याचे समोर आले आहे. मात्र या युतीच्या चर्चा शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांशी होणार नसल्याचा आता समोर आला आहे. भाजपचे स्थानिक नेते थेट मुंबई मधून येणाऱ्या नेत्यांशी युती संदर्भात आज चर्चा करणार आहेत.
दरम्यान सध्या तरी या युतीच्या चर्चांमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सामावून घेण्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी शिंदे सेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आम्ही युतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत 30 जागा घेणार नाही इतक्या कमी जागा दिल्या तर आणि स्वबळावर निवडणूक लढू असा स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता मुंबईच्या नेत्यांनी येऊन केलेली बोलणी स्थानिक नेते मान्य करणार का आणि युतीमध्ये सर्व अलबेला राहणार का ?
