पिंपरी-चिंचवड प्रभाग रचना ‘जैसे थे’ प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपा राष्ट्रवादीत जोरदार लढत होण्याची शक्यता

पिंपरी प्रतिनिधी – : (Pimpri-Chinchwad Municipal Elections ) कालच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या प्रभाग रचना जाहीर झाल्या या प्रभाग रचनेमुळे भारतीय जनता पार्टीत सब कुछ सही है अशी परिस्थिती पाहायला मिळाली तर राष्ट्रवादीत कभी खुशी कभी गम पाहायला मिळाले.

प्रभागांचे आरक्षण

महिला आणि पुरुष प्रत्येकी 64, अनुसूचित जातीसाठी (एससी) 20, अनुसूचित जमाती (एसटी) तीन, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) 35 आणि सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी 70 जागा राखीव असणार आहेत.

प्रभाग क्रमांक 2- चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग अशी रचना संपूर्ण प्रभागाची आहे.

या गावांमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेनेमध्ये खरी टक्कर पाहायला मिळणार आहे,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महायुती जर झाली तर सर्वच इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गोची होणार असल्याचे पाहायला मिळत आहे, सर्वच पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

भाजपाचे दिग्गज याच प्रभागात; इच्छुकांची नावे

पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहुल जाधव, युवानेते निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, सारिकाताई रास्ते, अश्विनी ताई जाधव, आदि इच्छुक असल्याचे पाहायला मिळते.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून
माजी नगरसेवक वसंतशेठ बोराटे, अतिश बारणे, महिला आघाडीचे अध्यक्ष कविता अल्हाट, विशाल जाधव, विशाल आहेर, आदि इच्छुक आहेत.

ठाकरे शिवसेनेकडून
2017 च्या निवडणुकीच्या वेळी
शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख रूपालीताई आल्हाट यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता या भागात त्यांची देखील मोठी ताकद वैयक्तिकरित्या पाहायला मिळते,

योगेशकाका बोराटे, राजू भुजबळ, गौरी घंटे, ठाकरे शिवसेनेकडून इच्छुक आहेत.

गेल्या विधानसभेच्या वेळी या भागातून आमदार महेश लांडगे यांना मोठे मताधिक्य मिळाले, या प्रभागात आमदार महेश लांडगे यांची देखील मोठी ताकद पाहायला मिळते.

प्रामुख्याने या भागात भारतीय जनता पार्टीत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

सर्वच इच्छुक दिग्गज असल्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यावर कोण कोणासमोर कोण लढणार हे चित्र लवकरच समोर येईल, मात्र भाजपाच्या गोटात सध्यातरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे, या प्रभागात अनेक मोठे पक्षप्रवेश सुद्धा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे; हे सुद्धा येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

काय म्हणाले महेश लांडगे मोशी तील भाषण दरम्यान