पिंपरी चिंचवड प्रभाग 2 उमेदवार वसंत बोराटेच्या बंधूंना पैसे वाटताना पकडले

पिंपरी प्रतिनिधी -: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणी महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार वसंत बोराटे यांच्या बंधू सागर बोराटे यांना पोलिसांनी रंगेहात पकडले.

सविस्तर वृत्त असे की पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार वसंत बोराटे यांचे बंधू सागर बोराटे यांना पोलिसांनी रंगेहात पकडले स्वराज्य रेसिडेन्सी येथील परिसरात पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना लागली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला व संबंधित रकमेसह त्यांची गाडी देखील ताब्यात घेतली आहे यामध्ये दारूचे बॉक्स मोठी रक्कम असा ते मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.