संपूर्ण पॅनल विजयी करण्याचा वाळुंजचां शब्द खरा ठरला; मात्र शाब्बासकी द्यायला दादा नाहीत मिलिंद वाळुंज यांना अश्रू अनावर
पुणे प्रतिनिधी -: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गजर पाहायला मिळाला. पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटावर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्चस्व दिसून आले.
पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नंदकुमार वाळंज हे विजयी झाले.
या गटात अविनाश बलकवडे आणि मिलिंद वाळंज यांच्यात मुख्य लढत झाली. अखेर मिलिंद वाळंज हे 5,297 मतांनी विजयी झाले.मुळशी पंचायत समितीच्या एकूण सहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन तर भाजपने एका जागेवर विजय मिळवला. पौड गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल मोरे या 2,145 मतांनी विजयी झाल्या. अंबडवेट गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण धनवे हे 1,776 मतांनी विजयी झाले.
जिल्हा परिषद गटात सुरुवातीच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मिलिंद वाळुंज सुरुवातीच्या आघाडीवर होते. त्यांनी ठाकरेंचे उमेदवार अविनाश बलकवडे यांचा 5 हजार 297 मतांनी पराभव केला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेला शब्द मिलिंद वाळुंज यांनी खरा ठरवला
या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अनेक दिग्गज इच्छुक होते मात्र भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मिलिंद वाळुंज यांना उमेदवारी देण्याचे ठरवले त्यानंतर दादांनी देखील त्यांना जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार विजयी पाहिजेत अशा सूचना देखील केल्या होत्या.
यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असताना मिलिंद वाळुंज म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व लोकप्रिय आमदार शंकर मांडेकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्यांचा विश्वास देखील कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवत आम्हाला विजयी केले मात्र आजचा विजय पाहण्यासाठी दादा हवे होते असे ते म्हणाले.
निश्चितच आपल्या भागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार व लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून पौड-अंबटवेट जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावा खेड्यापर्यंत विविध विकास कामे मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मिलिंददादा वाळुंज यांनी दिले.
