करोडो रुपयांचा विकास खेचून आणण्याची धमक फक्त वाळंज परिवाराकडे; गाव खेड्यातील नागरिकांचा उस्फुर्त पाठिंबा
मुळशी प्रतिनिधी -: राज्यात 7 फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
या गटातून कोण बाजी मारणार याबाबत अनेक तर्कविर्तक लावण्यात येत आहे. यातच पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातील राज्याचे स्वर्गीय तात्कालीन मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेगळी खेळी खेळत या भागाच्या विकासासाठी उच्चशिक्षित व स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार म्हणून मिलिंद वाळंज यांना रिंगणात उतरवले वाळंज यांच्या उमेदवारीमुळे मात्र अनेकांच्या मोठ्या अडचणी वाढल्या.
मिलिंद वाळंज सामाजिक कार्य सुरुवातीपासूनच आवड असल्यामुळे ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहेत मुळशी तालुक्यातील कुठल्याही गोरगरिबाच्या अडीअडचणीला ते नेहमीच धावून जातात, हॉस्पिटलचा प्रश्न असो किंवा सामाजिक व वैयक्तिक देखील प्रश्नांवर ते आपल्या भागातील नागरिकांसाठी ते मदतीचा हात घेऊन नेहमीच तत्पर असतात.
आपल्या भागाच्या विकासासाठी दूरदृष्टी व व्हिजनरी असलेला कार्यकर्ता शेवटचा टप्प्यात अजित पवारांच्या नजरेत भरला व स्वतः त्यांनी दिलेल्या उमेदवाराला मतदार मोठ्या मताने विजय करतील असा आशावाद जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव खेड्यातील नागरिकांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय वैयक्तिक संबंध असल्यामुळे किंवा प्रसिद्ध उद्योजक असल्यामुळे ते सीएसआर फंडातून देखील खूप मोठा निधी आपल्या भागाच्या विकासासाठी खेचून आणू शकतात एवढी धमक फक्त वाळंज कुटुंबियांकडेच आहे असे देखील नागरिक बोलून दाखवतात.
विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा रात्रीचा खेळ चाले
पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद वाळज यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसून येत आहे आपल्या भागाच्या विकासासाठी सक्षम व शाश्वत विकासासाठी वाळुंज यांना विविध पक्षातील अनेक नेतेमंडळी छुपा प्रचार करताना दिसून येत आहेत.
