पूणे प्रतिनिधी Pune news गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला उडालेल्या गँगवॉरमध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरची (Ayush Komkar) हत्या केली.
टोळीने पिस्तुलातून तब्बल 11 गोळ्या झाडल्या, त्यातील तीन गोळ्या लागून आयुषचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खटल्यातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरला (Bandu Andekar Arrested) पोलिसांनी परभणीत पळून जाण्याच्या प्रयत्नात पकडले. बुलढाणा पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. या अटकेमुळे प्रकरणात मोठी हालचाल झाली आहे.
याचबरोबर, पोलिसांनी सात ते आठ आरोपींनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व आरोपी पुणे परिसरातील असून त्यांना पुढील चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी परभणीकडे पळ काढत असताना पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
