पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार?

Share

पुणे :: पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात वयाची पंच्याहत्तरी पूर्ण झाल्यानंतर थांबणं अपेक्षित असल्याचे वक्तव्य केले.

त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतात हे देशासाठी शुभसंकेत आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवृत्तीवरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतात, त्यांची दाढी पिकलीय, डोक्यावरचे केस उडाले आहेत. जगभ्रमण करुन झालं, सत्तेची सर्व सुख उपभोगली आहेत. आता त्यांना आरएसएसकडून निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, अशा सूचना येतात, असे संजय राऊतांनी म्हटले.

अमित शहाच्या निवृत्तीनंतराच्या कार्यक्रमावर राऊत काय म्हणाले ?

अमित शाह यांनी राजकीय निवृत्तीनंतर काय करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी करायला येतात. नानाजी देशमुख होते, त्यांनी संघाचे उत्तम प्रकारचे कार्य केले. अनेकजण आपापल्या भागात सामाजिक आणि इतर कामे, करत असतात. त्याच्यापेक्षा आपल्याला कोण काय करणार त्याविषयी चर्चा करण्याचा कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *