घरफोडी करणाऱ्या कुख्यात टाेळीला अटक

नागपूर शहरातील व परिसरातीलशहरातील विविध परिसरातील पाच घरांमध्ये चाेरी करणाऱ्या टाेळीला पाेलिसांनी अटक केली आहे. आराेपींमध्ये एका अल्पवयीन आराेपीचादेखील समावेश आहे. चाेरट्यांकडून पाेलिसांनी साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हुडकेश्वर पाेलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

नितीन रविंद्र रामटेके (30, चिमुरकर ले आऊट, न्यू नरसाळा) हे मध्यप्रदेशातील सागर येथे नाेकरीनिमित्त राहतात. त्यांचा भाचा दीपक गेडाम हा कधीकधी येऊन घराकडे लक्ष ठेवत हाेता. 17 जून राेजी त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातून अज्ञात चाेरट्यांनी 3.82 लाखांचा मुद्देमाल लंपास केला हाेता. रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. हुडकेश्वर पाेलिस ठाण्याच्या पथकातून तांत्रिक तपास सुरू हाेता.

पाेलिसांनी खबऱ्यांचे जाळेव तपासाच्या आधारे माेहम्मद अर्शद साजीद शेख (20, गरीब नवाज चाैक, राेशनबाग, वाठाेडा), माराेती उफर् अभिषेक राजकुमार भाैतिक (24, शारदा नगर, वाठाेडा), तुषार राजेश राऊत (19, घाेगली, बेसा) व अल्पवयीन आराेपीला ताब्यात घेतले. त्यांनी घराेडी केल्याची कबुली दिली. सखाेल चाैकशी केली असता त्यांनी हुडकेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतच आणखी चार घरेफोडल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून 5 ताेळे साेने, दागिने, हिऱ्याची कर्णुले, दुचाकी असा साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदाेडकर, पंकजकुमार चक्रे, याेगेश काेरडे, बजरंग जुनधरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपासूनही ही टाेळी पाेलिसांच्या रडारवर हाेती. या टाेळीचा छडा लावण्यासाठी विशेष नियाेजन करावे लागले. या टाेळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

– ज्ञानेश्वर भेदाेडकर, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, हुडकेश्वर