सिंधुदुर्ग : भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात घुसून धाड टाकल्या प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कॅमेरा मनवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे.
निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरात धाड टाकला होता यावेळी २५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली होती.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर निलेश राणे यांनी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये २५ लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमधील वाद शिगेला गेला. निलेश राणेंच्या आरोपांनंतर नितेश राणे हे देखील आक्रमक झाले होते. कोकणात दोन्ही राणे बंधू आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
