मोशी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) भारतीय जनता पार्टीचे तथा सामाजिक कार्यकर्ते निखिलदादा बोऱ्हाडे यांचा वाढदिवस मोशीमध्ये विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनच्यावतीने महारक्तदान शिबिर, गोशाळेला चारा वाटप, सफाई कामगारांचा सन्मान, भजनी मंडळ स्पर्धा व सन्मान, आई वडील व बाप या विषयावर सामाजिक प्रबोधन, तसेच विविध विधायक कार्यक्रम राबवण्यात आले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरातून मोशी ,जाधववाडी , चिखली, बोऱ्हाडेवस्ती, 226 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
वाढदिवसाच्या निमित्ताने मोशी भागात विविध विधायक उपक्रम हाती घेऊन साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वात महत्त्वाचे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन युवकांच्या माध्यमातून हा विधायक उपक्रम राबवण्यात आला. याला युवकांकडूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व रक्तादात्यांचे आभार आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले,
यावेळी ते म्हणाले की निखिलदादा यावेळी 💯 टक्के महापालिकेत दिसणारा आहे, त्यांचे सामाजिक राजकीय सर्वांशी असलेले हितगुज संबंध हेच त्यांना महापालिकेत निवडून आणणार आहेत निखिलच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, निखिल हा खूप हळव्या मनाचा आहे तो जगात कोणालाही फसवू शकत नाही प्रामाणिक कार्यकर्ते हीच माझी देखील मोठी ताकद आहे माझ्यासोबत असल्यावर संघर्ष करावाच लागतो व तो आमच्या कार्यकर्त्यांचा चालूच आहे असे आमदार महेश लांडगे शुभेच्छा देताना म्हणाले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहुलदादा जाधव, माजी महापौर नितीन आप्पा काळजे, प्रखर हिंदुत्ववादी समाजप्रबोधनकार श्री.संग्राम बापू भंडारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी अध्यक्ष मा.हेमंतजी हरहरे, मा.उपमहापौर श्री.शरदतात्या बोऱ्हाडे , आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
