आमच्या गावाच्या मूलभूत सुविधासाठी आमची हक्काची जमीन आम्हाला द्या नेरे ग्रामस्थ

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन देतो म्हणून कबूल केले होते; प्रशासनाला हाताशी धरत ग्रामस्थांना अटक

आमदार शंकर विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार का? याकडे सर्वांचे लक्ष

मुळशी प्रतिनिधी -: गावातील मूलभूत विकास कामांच्या सुविधासाठी मुळशी तालुक्यातील मारुंजी चांदे नेरे जांभे गावातील 31 एकर जमीन नागरी सुख सुविधांसाठी मिळावी यासाठी अनेक वर्षापासून ग्रामस्थ सरकार दरबारी मागणी करत होते.

महाविकास आघाडीचे सरकार असताना तात्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या गावठाणातील गायरान जमिनीला तात्विक मान्यता दिली होती,

संबंधित गावची लोकसंख्या व वाढते शहरीकरण पाहता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाला आदेश दिले होते

नेरे गावातील 20 एकर जागेपैकी दहा एकर जागाही विविध विकास मत कामासाठी देण्यात येईल लवकरच ग्रामस्थांची व जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक देखील झाली होती मात्र आज नेरे गावात गावकऱ्यांना जमीन न देता म्हाडाला हस्तांतरित करण्यासाठी प्रशासन पोलीस असह नेरे येथे दाखल झाले;

गावातील नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलीस प्रशासनासह प्रशासन मोठा फौज फाटा घेऊन नेरे येथे दाखल झाले; त्यानंतर ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने जमले;

यावेळी गावकरी म्हणाले की भूसंपादन आमचा विरोध नाही मात्र राज्य सरकार दरबारी व जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये आम्हाला गावाच्या विकासासाठी 10 एकर क्षेत्र देण्याचे प्रशासनाने कबूल केली होती मात्र तशी कुठलीही जागा आम्हाला दाखवली नाही त्यामुळे आम्हाला जागा हस्तांतरित करा नंतरच म्हाडाला द्या अशी मागणी नागरिक करत होते.

वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावाच्या नागरी विकासासाठी आम्हाला आमच्या हक्काची गावाची जमीन द्या आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत; तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील गावकऱ्यांच्या सहमतीला पाठिंबा दिला आहे तसे प्रशासनाला आदेश देखील दिले आहेत मात्र प्रशासन ही दुपटी भूमिका का घेते आज प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.