करोडो रुपयांची प्रॉपर्टी असलेले राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार प्रभागाच्या कामे करणार नाहीत

शांताराम कटके विठ्ठल भक्त त्यामुळे कामाची गॅरंटी आमची भरतशेठ गोगावले

वाघोली प्रतिनिधी -: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून, प्रत्येक प्रभागात प्रचाराला वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ वाघोली खराडी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार शांताराम कटके प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, विकासाच्या मुद्द्यावर वाघोली खराडीकरांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांवर सळसळून टीका केली यावेळी ते म्हणाले की चार पाचशे कोटी रुपयांचा असणारा माणूस तुंबलेली गटार काढायला येणार आहे का त्यामुळे आपल्याला शिवसैनिकच निवडावा लागेल, राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे आर्थिक मजबूत आहेत त्यामुळे या भागाचा विकास होऊ शकणार नाही सर्वसामान्यला हे कार्यालयात देखील येऊ देणार नाहीत त्यामुळे यांना यांची जागा दाखवा व आपल्या हक्काचा 24 तास माणसात असणारा शांताराम कटकेनां निवडा व महापालिकेत पाठवा असे आव्हान यावेळी त्यांनी केले.

शांताराम कटके म्हणजे धार्मिक माणूस विठ्ठलाचा भक्त आणि विठ्ठलाचा भक्त हा कधी लबाड नसतो त्यामुळे शांताराम कटके सारख्या माणसाला संधी द्या शिंदे साहेब नगर विकासमंत्री आहेत त्यामुळे या भागाचा विकास निश्चित होईल असे आश्वासन त्यांनी दिले.