नाशिक प्रतिनिधी – भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशकातील नेते वसंत गिते यांनी सत्ताधाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप वसंत गिते यांनी केला आहे.ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल होत आहेत. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. मात्र, भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या इनकमिंग बाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांनी गंभीर आरोप केलाय… महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप वसंत गिते यांनी केला आहे.
नवीन बातम्यासाठी व्हाट्सअप चैनलला कॉल करा
https://whatsapp.com/channel/0029Vb9yW9YKmCPX7kNeWt0A
खोटे गुन्हा दाखल करून , ब्लॅकमेलिंग करून पक्षात प्रवेश करायला भाग पाडलं जात असल्याचा आरोप गिते यांनी केला आहे.सत्तेत असलेल्या पक्षांनी गृहखात्याचा वापर करणं यामध्ये काही नवीन नाहीय. याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचं राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुके यांनी म्हटलंय. जशा पालिका निवडणुका जवळ येतायत तशा सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश होताना दिसताहेत.. त्यात हे पक्षप्रवेश पोलिसांच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गिते यांनी खळबळ उडवून दिलीय़.