Nashik MLC Result: ”माझ्याशी गद्दारी झाली”, शिंदेंचा शिलेदार भडकला,

Pune नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीतून अत्यंत धक्कादायक आणि राजकीय गणिते बदलून टाकणारी बातमी समोर येत आहे. निवडणूक रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला.

या पराभवानंतर नरेंद्र द दराडे यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी गद्दारी झाल्याचा संताप दराडे यांनी व्यक्त केला.

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत झालेल्या १५० मतांपैकी तब्बल १०० हून अधिक मतांचा कोटा एकट्या गोकुळ गीते यांनी पूर्ण केला. पहिल्याच फेरीत मिळालेल्या या एकतर्फी मतदानामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार बॅकफूटवर गेले. त्यानंतर गोकुळ गीते यांनी आपली विजयी आघाडी कायम ठेवली. संख्याबळाचा विचार करता या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र, तरीदेखील महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. तर, भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला.

माझ्याशी गद्दारी….
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दराडे यांनी सांगितले की, माझ्याशी सगळ्यांनी गद्दारी केली. आमच्या नेत्यांना अंधारात ठेवण्यात आले. केसाने आमचा गळा कापला असल्याची भावना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केली.

> नाशिक विधान परिषदेचा निकाल, कोणाला किती मते?
एकूण मतदान -६१८

पैकी १३ अवैध
६०५ वैध मते
कोटा ३०३

अपक्ष गिते -३५७
महायुती नरेंद्र दराडे – २४८ ( ४ टेबलं )

गिते विजयी

प्रसाद हिरे -00