नाना भानगिरेनां मत म्हणजे विकासाला मत

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणेकरांना शब्द; शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा

हडपसर प्रतिनिधी -: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-रिपाई या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी पुण्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि लाडक्या बहि‍णींना खूश करण्यासाठी तीन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ४१ चे अधिकृत उमेदवार प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आव्हान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचार फेरी रॅलीच्या दरम्यान करण्यात येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वासू प्रमोद उर्फ नाना भानगिरे आहेत नानांना मत म्हणजे विकासाला मत असे सांगत प्रचारात भानगिरे समर्थकांनी चांगलाच जोर धरल्याचे दिसून येत आहे.

आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी १५ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नानांना मत देऊन विजय करावे असे आव्हान त्यांनी केले आहे.

आपल्या भागातील प्रलंबित प्रश्नांवर निश्चित तोडगा निघेल असा विश्वास देखील यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.