मांजरी प्रतिनिधी (Pune News) महापालिका निवडणुकीपूर्वी महापालिका आयुक्तांकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात शहरातील विकासकामांसाठी आता महापालिकेकडूनही निधी दिला जाणार असून, त्यासाठी विकासकामांची यादी मागविण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे व महापालिकेत समाविष्ट गावांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागत आहे,
मात्र या अडचणीसाठी शिवसेनेच्या (Shivsena) वतीने नेहमीच पुढाकार घेतला जातो शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले यांनी आज मांजरी बुद्रुक येथील ओम पार्क फेज 5 येथील रस्त्यावर मुरूम टाकून लेवल करण्यात आली,
पावसामुळे व खड्ड्यांमुळे सोसायटी धारकांना रस्त्याने चालणे देखील कठीण झाले होते याची तात्काळ दखल घेत पुणे महापालिकेच्या वतीने शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले यांनी समस्याचे निरंकारण केले.
