सुपा प्रतिनिधी -: mla suresh Dhas son car accident : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण घटना घडली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारचा आणि दुचाकी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेनंतर कारच्या अफघाताचे काही फोटो समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नितीन शेळके असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या अपघातामध्ये मृत पावलेल्या दुचाकी स्वाराचे नाव नितीन शेळके असे असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गावर रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दुकाकीस्वार ठार झाला आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस याच्या चारचाकी वाहनाने थेट दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने मागून जोराची धडक दिली आहे. त्यानंतर नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
अपघातावेळी वाहनात सागर सुरेश धस (Suresh Dhas) (रा. आष्टी, बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता. आष्टी. जि.बीड) हे दोघे जण होते. दुचाकीस्वाराला मागून धडक बसल्याचे माहिती समोर येत आहे.
नवनवीन बातम्यासाठी व्हाट्सअप चैनलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029Vb9yW9YKmCPX7kNeWt0A
दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून पारनेरकडे येत असताना, सागर धस याच्या वाहनाने मागून धडक जोराची धडक बसली. अपघात झाल्यानंतर त्याची माहिती सुपा पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.