पुणे प्रतिनिधी (Pune News) दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत १४५ कोटी वृक्ष लागवड देशात करण्यात येत आहे.
याच धर्तीवर शासकीय मुलींचे बालगृह मुंढवा येथे वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला,
जिल्हा महिला बाल विकास अधिकारी पुणे व होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन, गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माँ के नाम २.० वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपायुक्त महिला विकास, सुरेश टेळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, नोडल अधिकारी, मनीषा बिरारीस, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या संध्या नगरकर, गेस्टॅम्प ऑटोमोटिव्हचे अजय चौधरी, डॉ. कॅरोलिन,संस्थापक होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी 200 देशी फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रसंगी उपायुक्त सुरेश टेळे म्हणाले की, केंद्र सरकारने एक झाड आईसाठी ही संकल्पना भविष्याच्या दृष्टिकोनातून लागू केली आहे व या संस्थेने एकत्रित येत या उपक्रमाचे आयोजन केले हे खरच कौतुकास्पद आहे.
डॉ. केरोलीन यांनी महिला बाल विकास विभागासोबत दीर्घकालीन सहकार्याचा उल्लेख केला वृक्ष रोपणासाठी अनेक वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण आजपर्यंत केलेले आहे,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संचालन अधिकारी शकील शेख यांनी केले, अजय चौधरी म्हणाले सीएसआर फंडातून पर्यावरण विषयक उपक्रम राबवले जातात त्यातीलच एक पेड माँ नाम हा उपक्रम शासनाबरोबर राबवत असल्याचा आनंद होतो, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश डिंबळे यांनी केले.