मुळशीतील विजयाचा विकासाकडे टर्न; आयटी नगरीच्या विकासाची जबाबदारी आमची केंद्रीय राज्यमंत्र्याचा बुचडेनां शब्द

मुळशी प्रतिनिधी -: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यात भाजपची एन्ट्री झाली आहे.

हिंजवडी जिल्हा परिषद गटात भाजपचे शिवाजी बुचडे यांनी तब्बल 1900 च्या फरकांनी विजय प्राप्त केला तर हिंजवडी गणात ऐश्वर्या वाघमारे यादेखील मोठ्या मतांनी विजयी झाल्या.

मुळशी तालुका हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा तालुका म्हणून ओळखला जातो मात्र या विजयामुळे भाजपाच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आज केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी दोन्ही विजय उमेदवारांचे अभिनंदन केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरली यांना मोहोळ यांनी हिंजवडी भागातील विकास कामांचा आढावा घेतला यावेळी आयटी नगरीमध्ये सर्वाधिक ट्रॅफिकची समस्या, रस्ते ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, आयटी पार्क मधील पायाभूत सुविधांची तसेच परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांसाठी भविष्यात विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी बुचडे पाटील, पंचायत समितीच्या सदस्य ऐश्वर्याताई वाघमारे यांच्यासोबत चर्चा करून मुळशी तालुक्यातील विकासाची जबाबदारी ही आमच्यावर देखील असणार आहे भविष्यकाळात विकासाच्या दृष्टीने लागेल ती मदत आम्ही तुम्हाला निश्चित करू असा देखील विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

माण हिंजवडी जिल्हा परिषद गटाच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर रस्ते, ड्रेनेज, स्ट्रेटलाईट, औद्योगिक भागातील प्रलंबित प्रश्न, ट्राफिकची समस्या, नव्याने उभा राहत असलेल्या आयटी पार्क संदर्भातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व काही मदत केली जाईल असा शब्दच केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी दोन्हीही विजयी उमेदवारांना दिला.