मुळशी तालुक्यातील बाबूजी उर्फ नंदकुमार वाळंज यांना ‘भास्कर भूषण’ प्रदान

उल्लेखनीय कार्याची दखल; भास्कर पब्लिकेशन व BBL मराठी न्यूजकडून गौरव

पुणे प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक आदरणीय बाबूजी उर्फ नंदकुमार सोनू वाळंज यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

कृषी, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क व बीबीएल मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे झालेल्या सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी येथे शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर-अण्णा तापकीर, नंदकुमार उर्फ बाबुजी वाळंज, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई, दिलीप बनाडे आदी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून सावंत यांचे अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार भविष्यात अधिक जोमाने शेतकरी आणि समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे, असेही सावंत यांनी सांगितले.