Mulshi Result : मुळशीचा पॅटर्नच वेगळा! घड्याळाचा ‘गजर’, आमदार मांडेकरांच्या होम पिचवर कमळ फुलले

pune news जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यातील भुगाव-पिरंगुट जिल्हा परिषद शांताराम इंगवले विजयी झाले

तर, भाजपने प्रथम मुळशी तालुक्यात खाते उघडले आहे. हिंजवडी गटात भाजपचे शिवाजी बुचडे तर हिंजवडी गणात ऐश्वर्या वाघमारे विजयी झाल्या आहेत. आमदार शंकर मांडेकर यांच्या होम पिचवर भाजपाला मोठे यश आले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभागणी ही शेळकेंसाठी फायदेशीर ठरेल अशी शक्यता होती. माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. सुरुवातीच्या कलांमध्ये त्यांना 3162 मतं मिळाली तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महादेव कोंढरे यांना 3337 मतं मिळाली. तर, पांडुरंग (आबा) शेळके यांना 5247 आघाडीवर होते.

तर शेळके हे अखेरच्या टप्प्यात विजयी झालेमाणमध्ये मंदा शेळके विजयी

माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा शेळके यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 5997 मंतं मिळाली तर, भाजपच्या युगंधरा पारखी यांना युगंधरा पारखी 33O5 मतं मिळाली. ठाकरे गटाच्या कल्पना भेगडे यांना 3521 मतं मिळाली. तर, अपक्ष रुपाली बोडके यांनी चांगली लढत दिली त्यांना 3670 मतं मिळाली.

पौड-अंबटवेट गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल मोरे या 2145 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माजी सभापती कोमल वाशिवले यांचा पराभव केला. काजल मोरे यांना 6143 तर, कोमल वाशिवले यांना 3998, पल्लवी कंधारे यांना 3213 मतं मिळाली.

जिल्हा परिषद गटात सुरुवातीच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मिलिंद वाळुंज सुरुवातीच्या कलापासून आघाडीवर होते. आणि अंतिम निकालात त्यांनी विजय मिळवला.