मुळशी धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कधी मिळणार विभागीय आयुक्तांना निवेदन

मुळशी प्रतिनिधी – : मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी, दळणवळणाच्या सुविधा, विद्युत दाहिनी यांसारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवरकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे,

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे हे वारंवार धरणग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्येसाठी आवाज उठवताना दिसून येतात गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी आंदोलन करत देखील निषेध व्यक्त केला होता, त्यानंतर प्रशासनाला जाग आली होती, मुळशी धरणग्रस्त भागातील मागण्यांसाठी व त्यांचे हक्काचे पाणी शेतीसाठी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील मागणी करत त्यांनी आज विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, व निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची भेट घेत निवेदन दिले.

प्रामुख्याने धरणग्रस्त भागातील समस्या लवकर सोडवाव्यात अन्यथा भिरा (रायगड) येथील वीज निर्मिती करता पाणी सोडू देणार नाही असा इशारा देखील तालुक्यातील 17 ग्रामपंचायतच्या माध्यमातून 52 गावांकडून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे,

ज्यावेळी अमित कंधारे म्हणाले की; मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक एक व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुळशी भागातील पाणीपुरवठ्याच्या कामांना गती द्यावी. टप्पा क्रमांक १ अंतर्गत २८ गावांचा तर टप्पा क्र. २ अंतर्गत २२ गावांचा समावेश आहे. या गावांसाठी मागील बैठकीत १.२० टीएमसी एवढे अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले होते. या सर्व गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी उर्वरित कामे गतीने करण्यात यावीत, कोर्टापर्यंत जाऊन या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे नेहमीच काम करत आलोय, धरणग्रस्त भागातील अनेक समस्या ज्वलंत आहेत हक्काचे पाणी मिळवण्यासाठी मुळशीचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून व जिल्हा नियोजन च्या माध्यमातून या भागातील कामासाठी 50 कोटी रुपयांचे कामे केली आहेत येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित कायमस्वरूपी तोडगा आम्ही काढणार आहोत यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.

मुळशी जलाशयातील प्रवासी नौका जुनी व नादुरुस्त झाल्याने नवीन प्रवासी नौका खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येथील पर्यटनास चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी याठिकाणी जेट्टी उभारण्याची स्थानिकांची मागणी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून तांत्रिक मंजुरी प्राप्त करून घेऊन तात्काळ कार्यवाही करावी. तोपर्यंत मुळशी धरण क्षेत्रातील नागरिकांच्या दळणवळणासाठी जिल्हा परिषदेने पर्यायी नौका उपलब्ध करून द्यावी. यासाठी टाटा पॉवरने तात्काळ ‘ना हरकत प्रमाणपत्र’ द्यावे.

मुळशी धरण भागातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी वाढीव पाणी उपलब्ध होण्यासाठी यापूर्वीच्या बैठकीत धरणाची उंची १ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी टाटाची ८० टक्के आणि खाजगी स्वरुपाची २० टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण महसूल विभागाने तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.

यावेळी मुळशी धरण भागातील गावठाण विस्तारासाठी अत्यावश्यक असणारी जमीन मोजणी करुन हद्द कायम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुळशी धरण भागातील विविध गावांना पाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी तसेच इतर शासकीय कामांसाठी टाटाने सहकार्य करण्याबाबत व मुळशी धरण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविणेबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.