मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मासिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न

Share

पुणे प्रतिनिधी :: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार असून, त्या संदर्भात मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मासिक सभेचे आयोजन, युवराज बँक्वेट हॉल घोटावडे येथे करण्यात आले होते,

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली, तालुक्यातील शासकीय कमिट्या, मार्केट कमिटी, विशेष कार्यकारी अधिकारी निवड, या संदर्भात चर्चा करण्यात आली.

मुळशी तालुक्याच्या शाश्वत विकासामध्ये अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वसामान्य मतदार हा त्यांच्यावर प्रेम करणारा आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी जोरदार कामाला लागा असे एक मताने ठरविण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, माजी गटनेते शांताराम इंगवले , जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक कालीदास गोपाळघरे, माजी अध्यक्ष सुनील वाडकर, कारखान्याचे माजी संचालक पोपट दुडे , जिल्ह्याचे नेते संजय उभे , सहकार सेलचे अध्यक्ष सुनील कदम , जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सणस , माऊली कांबळे, बबनराव धिडे, माऊली साठे , राजेंद्र दबडे, सचिन अमराळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस युवक मुळशी अध्यक्षपदी सुखदेव मांडेकर यांची व विधानसभा अध्यक्ष पदी पंकज हरपुडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *