Pune update news – महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) ही घटनात्मक संस्था असून यामध्ये अध्यक्ष आणि सचिव ही महत्त्वाची पदे आहे. आयोगाच्या परीक्षा, निकाल, शिफारसी, न्यायालयीन प्रकरणे, नवीन नियमावली लागू करणे आदी सर्व जबाबदाऱ्या या सचिवांकडे असतात.
तुकाराम मुंढे हे पारदर्शक अधिकारी म्हणून ओळखले जातात यांची निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे विद्यार्थ्यांच्या मतानुसार तुकाराम मुंडे जर सचिव झाले तर एमपीएससीतील गोंधळ कमी होऊन पारदर्शक परीक्षा होती असा त्यांना विश्वास वाटत आहे.
तसेच सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात. मात्र, राज्य सरकारमधील अधिकारी सचिवपदाची जबाबदारी घ्यायला उत्सुक नसल्याने दोन महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. यामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुचबुज सुरू झाली आहे. एमपीएससीचा कारभार सुधारायचा असेल तर तुकाराम मुंढे यांचीच सचिव पदावर नियुक्ती करा, अशी मागणी पुढे आली असून याला खूप प्रतिसाद मिळत आहे.तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात परिचयाचे नाही अशी व्यक्ती मिळणे फार कठीण आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असते.
सचिव पद महत्त्वाचे का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील (एमपीएससी) अत्यंत महत्त्वाचे असे सचिवपद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. काही दिवसांपूर्वी या पदावर अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर यांची प्रतिनियुक्ती केली. पण त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे डॉ. सुवर्णा खरात यांचा कार्यकाळ संपल्यापासून सचिवपद रिक्त असून ‘एमपीएससी’चा संपूर्ण कार्यभार वाऱ्यावर आहे. विशेष म्हणजे, कुणीही सनदी अधिकारी ‘एमपीएससी’च्या सचिव पदाचा काटेरी मुकुट घालण्यास तयार नसल्याने हे पद रिक्त असल्याची माहिती आहे. आयोगाच्या परीक्षा, निकाल, शिफारसी, न्यायालयीन प्रकरणे, नवीन नियमावली लागू करणे आदी सर्व जबाबदाऱ्या या सचिवांकडे असतात. तसेच सचिव हे कार्यालयीन प्रमुखही असतात. अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सचिवांकडे आहेत. ‘एमपीएससी’मध्ये सचिव हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे यासाठी सक्षम अधिकाऱ्याचा शोध घेण्यात आला आहे. आगामी काळात आयोगामध्ये अनेक बदल होणार असल्याने ते सर्व सुरळीत चालवू शकणाऱ्या अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती होणार आहे. लवकरच नवीन सचिवांची नियुक्ती होईल, अशी माहिती व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांनी दिली आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
