मोशी प्रतिनिधी -: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस अमृत महोत्सव सेवा पंधरवड्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला,
आज मोशी येथे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक युवा नेते निखिलदादा बोऱ्हाडे व सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानात मोठ्या संख्येने मोशी चिखली,बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, बोराटे वस्ती, व परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला,

डोळ्याची आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करत डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली,
यावेळी निखिल शिवाजी बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मोठी मेहनत घेतली.

