पिंपरी चिंचवड – : महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ महानाट्य मोशी येथे होणार आहे याबाबतची माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या ’जाणता राजा’ या महानाट्याचे ६ आणि ७ डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी ६:४५ वा. स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण”
छत्रपती श्री संभाजी महाराज पुतळा मैदान (आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र) मोशी आयोजित करण्यात आले आहे.
