पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे. याशिवाय पवना नदी सुधार प्रकल्प, अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील अघोषित भार नियमांवर उपाययोजना करणे, हिंजवडीमधील आयटीयन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्टट्रॅक लेबर कोर्ट प्रणाली विकसित करणे तसेच हिंजवडीतील विविध समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट स्थापन करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील 48 प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य म्हणजे विविध लक्षवेधींच्या माध्यमातून महत्वाच्या प्रश्नांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे जोरदार मागणी करणार असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. 14 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून, यामध्ये पिंपरी चिंचवड सह राज्यातील प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील पवना जल सुधार प्रकल्प सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी निधीची तरतूद करून तातडीने पवना सुधार योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी सभागृहाचे लक्ष वेधण्यात येईल असे जगताप म्हणाले. अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याने जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार जगताप म्हणाले.
लक्षवेधी सूचनांद्वारे वेधणार सभागृहाचे लक्ष
पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे. याशिवाय अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील अघोषित भार नियमांवर उपाययोजना करणे, हिंजवडीमधील आयटीयन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्टट्रॅक लेबर कोर्ट प्रणाली, पीएमआरडीच्या वतीने लिलावाने विक्री होत असलेल्या भूखंडाला स्थगिती देणे, काळेवाडी हिंजवडी बिजलीनगर या महावितरणच्या शाखा कार्यालयांचे विभाजन करणे, राज्यातील वंचित व मागास समाजातील विद्यार्थ्यांना महाज्योती तर्फे 126 कोटी रुपयांची थकीत छात्रवृत्ति तात्काळ मंजूर करणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी देखील शासनाकडे करणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रारूप विकास आराखडा नुकताच सादर करण्यात आला. या प्रारूप विकास आराखड्यामध्ये अनेक चुका आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. नागरिक याविषयी वारंवार तक्रारी करत आहेत. यामुळे जनमनाचा आदर राखत हा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा , काळेवाडी रहाटणी परिसरातील विक्रांत वाईन शॉप दारूचे दुकान देशी दारूचे दुकान (CL-III 300) परवाना रद्द करणेबाबतअशी मागणी देखील शासनाकडे करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले आहे.
