आमदार कटकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक ४ वाघोली खराडी प्रचार रॅलीत; झळकले आमदार पठारेंचे फलक

दोन्ही आमदार म्हणजे फेविकॉल का जोडा सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुणे प्रतिनिधी :: महापालिका निवडणूकीसाठी भाजपने अनेकांना धक्का दिला आहे. गेली दीड दशके सत्तेत असल्याने यावेळी अनेक अनुभवी व दिग्ग्जांना नारळ देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

प्रभाग क्रमांक ४ वाघोली खराडी मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक गोष्टी घडल्या;

खराडी विधानसभा मतदारसंघातून लोकांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे तुतारीचे बापूराव पठारे यांना विधानसभेत पाठवलं मात्र त्याच आमदार पठारेनी महानगरपालिकेला आपल्या विधानसभा मतदारसंघात तुतारीला वंचित ठेवले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फसवले अशी टीका त्यांच्यावर चौफेर होत आहे;

आमदार माऊली कटकेच्या रॅलीत; आमदार पठारेचे फलक

काल प्रभाग क्रमांक ४ वाघोली खराडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदयात्रेदरम्यान बापूराव पठारे यांचे सर्वत्र फलके पाहायला मिळाली; आमदार कटके यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शासन नियुक्त नगरसेवक अजित दादांचे विश्वासू समर्थक शांताराम कटके यांची आमदार कटकेच्या हट्ट मुळे उमेदवारी कट केली; व माऊली कटकेंनी देखील आमदार पिता पुत्रावर जोरदार टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मात्र रॅली दरम्यान आमदार पठारे यांचे फलक पाहायला मिळाले.

नेमकं जनतेने समजायचं काय हादेखील मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे;