पिरंगुट प्रतिनिधी :: श्री भैरवनाथ कासारसाई, श्री संत तुकाराम नेरे, गुरुदत्त जांभे व प्रियदर्शनी सोसायटी विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे उपस्थित होते. यामध्ये संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी कामकाजाचा आराखडा मांडण्यात आला.
यावेळी सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजना या सर्व सभासदांना सांगण्यात आल्या.
सोसायटीचे संगणकीकरण बँक शाखाचे अधिक आधुनिकरण याची देखील माहिती सर्व सभासदांना देण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज गेल्या साडेतीन वर्षात प्रचंड वेगाने वाढले गेले 15000 कोटी पेक्षा अधिकच्या ठेवी व 13000 कोटीचे कर्ज बँकेने वाटलेले आहे व 439 कोटी रुपयांचा नफा देखील यावेळी बँकेला झाला,
याची दखल घेऊन बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल साडेतीन वर्षात सात पुरस्कार मिळाले याचा देखील निश्चित मोठा अभिमान आपल्याला सर्वांनाच असला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी जिल्हा बँकेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले.
